पती आणि मुलावर चाकूने वार

PCB Admin
1 Min Read

रावेत, दि. २१ (पीसीबी) – रो हाऊस विकून त्याचे पैसे मला आणून द्या म्हणत पत्नीने घरातील भाजी कापण्याच्या चाकुने पतीला व दोन मुलांना मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार रावेत येथे शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी चारच्या सुमारास घडला.

सचिन प्रविण दुसाने (वय 52, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन यांची पत्नी (वय 50) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीने निगडी येथील रो हाऊस विकून मला पैसे आणून द्या म्हणत घरातील भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. यावेळी फिर्यादीचा मुलगा मध्ये आला असता त्यालाही चाकूने मारून जखमी केले. तर दुसऱ्या मुलाला हाताने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article