अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

0
263

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस निमित्त राष्ट्रवादी शिक्षक सेल वतीने श्री वाघेश्वर विद्यालय येथे विध्यार्थी करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ संदीप तापकीर (राष्ट्रवादी शिक्षक सेल अध्यक्ष), प्रा. कविता आल्हाट (महिलाध्यक्षा) तसेच अरुण बोऱ्हाडे, घनश्याम खेडकर, अर्बन सेल चे दत्तात्रय जगताप, पंडित तात्या तापकीर, किसन गाडेकर, ज्योती तापकीर, विपुल तापकीर, पूनम वाघ, अनिल तापकीर, गणेश ताजने, गुलाब ताजने, विजया कांबळे, दत्ता बुरडे, सुनील पठारे, तानाजी तापकीर, एड संतोष तापकीर, रामभाऊ सासवडे, पधादिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा डॉ संदीप तापकीर यांचा संकल्पनेतून सर्व सामान्य विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती व मार्गदर्शन मिळाव हे उद्धेशाने या केंद्राचे श्री वाघेश्वर विद्यालय मध्ये सुरु करण्यात आले आहे. कुमारी अंकिता काळजे या चऱ्होलीच्या मुलीने सी ए चा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली, अंकिता चा सन्मान राष्ट्रवादी शिक्षक सेल वतीने अजितभाऊ गव्हाणे यांचा हस्ते करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य शशिकांत पेठे आणि सर्व शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले, सर्वांचं आभार. शिक्षक सेल चे सरचिटणीस श्री हिरामण सस्ते, शारदा सस्ते मॅडम, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सौ सारिका तापकीर मॅडम यांनी सूत्र संचालन व मोहन कांबळे सर यांनी आभार मानले. तसेच वाघेश्वर विद्यालयाचे वतीने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली . शाळेत वृक्ष रोपंन करण्यात आली. तसेच शाळेतील छोट्या मुली बरोबर केक कापून अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा केला.