पुणे, दि. २५ (पीसीबी) – साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केलेला नाही. पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले.