मामाने केला अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार

0
189

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मामाने अल्पवयीन भाचीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार 17 ते 26 जून आणि 1 जुलै रोजी पिंपरी परिसरात घडला. याप्रकरणी पीडित 14 वर्षीय मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 29 वर्षीय मामाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामाने पीडित भाचीवर वेळोवेळी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मामा हा भाचीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना भाची ओरडली. त्यावेळी तिचा मावसभाऊ तिथे आला. मामाने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आरोपी मामाने फिर्यादी यांच्या घरातील कपाटाचे काचा फोडून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.