घरासमोर पार्क केलेला दहा चाकी ट्रक चोरीला

PCB Admin
1 Min Read

चिखली, दि. ४ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेला 10 चाकी ट्रक अज्ञातांनी अवघ्या एका तासात चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 2) सकाळी दहा ते अकरा वाजताच्या कालावधीत कुदळवाडी चिखली येथे घडली.

महंमद जिकरी खान (वय 52, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे ट्रक चालक आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीचा अडीच लाख रुपये किमतीचा 10 चाकी ट्रक (एम एच 04 / एफ जे 6834) घरासमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केला. अवघ्या एका तासात अज्ञात चोरट्याने खान यांचा ट्रक चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article