वाकडमध्ये मुलीला अपहरण करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या दोन अभियंत्यांना ठोकल्या बेड्या

0
411

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – फेसबुकवरून नंबर घेवून मुलीला अपहरणाची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन उच्च शिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. फळ विक्रेता, डॉक्टर, रिक्षावाला, पंक्चर काढणारा, पान टपरीचालक असे वेषांतर करून पोलिसांनी सापळा रचला त्यात दोन्ही आरोपी अलगद अडकले.