जिओ – फेसबुक करारानंतर मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत व्यक्ती

0
988

नवी दिल्ली, दि.२३ (पीसीबी) : सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं रिलायन्ससोबत मोठा व्यवहार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ मध्ये फेसबुकनं ५.७ बिलियन म्हणजे ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कारारानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी चीनमधील अलीबाबाचे संस्थापक जॅक मा या मागे टाकलं आहे.

फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्या कारारानंतरच मुकेश अंबानी यांनी जॅक मा ला मागे टाकतं आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. काल मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ४ अरब डॉलर्सची वाढ होऊन ती आता ४९ अरब डॉलर्स एवढी झाली आहे. चीनच्या जॅक मा यांच्या संपत्तीपेक्षा ३ अरब डॉलर्सनी मुकेश अंबानी यांची संपत्ती जास्त आहे.

मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली होती. जवळपास १४ अरब डॉलर्सनी घट झाली होती. तर अरब डॉल संपत्तीत १ अरब डॉलर्सने घट झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी वाढ

फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्या कारारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी चांगली वाढ झालेली पाहायला मिळाली. एका वेळी तर ११ टक्क्यांनी वाढ होत शेअर १३५९ वर गेलेला पाहायला मिळाला. काल एका दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मार्केट कॅपमध्ये ९० हजार कोटींचा फायदा झाला.

काय आहे फेसबुक-जिओ डील?

उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ मध्ये फेसबुकनं ५.७ बिलियन म्हणजे ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बुधवारी फेसबुकनं याबाबत घोषणा केली. एएनआयच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ मध्ये ९.९९ टक्के हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल.

फेसबुक-जिओ इतिहास

वर्ष २०१६ मध्ये जिओचं लॉन्चिंग झालं. रिलायन्स जिओ ही देशातील एकमेव कंपनी आहे जिचा ग्राफ नेहमी उंचावलेला आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारात अमेरिकन टेक्नीकल समुहांशी प्रतिस्पर्धा करु शकण्यास जिओ सक्षम देखील आहे. रिलायन्सनं मोबाईल टेलिकॉमपासून होम ब्रॉडबॅंडपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ई-कॉमर्सचा विस्तार केला आहे.

तर दुसरीकडे भारतात फेसबुक आणि त्याच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचं मोठं जाळं आहे. भारतात फेसबुकचे ४०० मिलियन यूझर्स आहेत.