40 कोटींच्या संपत्तीपायी बाप लेकीने केले हे भयंकर कांड…

0
199

बंगळुरु, दि. ३१ (पीसीबी) : कर्नाटकातील महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना तीनच दिवसात यश आलं आहे. या प्रकरणी सात आरोपींना अटक झाली असून त्यामध्ये मृत महिलेचा पती आणि तिच्या मुलीचाही समावेश आहे. 27 डिसेंबरच्या रात्री अर्चना रेड्डी नावाच्या महिलेची कर्नाटकात हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील खरं कारण म्हणजे तिची 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं बोललं जातं.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
अर्चना रेड्डी यांची संपत्ती मिळवण्यासाठी बाप-लेकीने तिची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारीच्या आधारे तपास केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेचा पती नवीन रेड्डी याने पाच सशस्त्र हल्लेखोरांसह पत्नीवर चाकूने वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
पती नवीन अर्चना रेड्डीवर चाकूने वार करत असताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. त्याच्याशिवाय पाच जण हल्ला करत असल्याचंही दिसत आहे. नवीनच्या अनैतिक संबंधांची कुणकुण अर्चना यांना लागली होती. तर अर्चना यांचेही विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय नवीनला होता. या कारणावरुन दोघांमध्ये वारंवार खटके उडत असत.
डीसीपी श्रीनाथ एम जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चनाचा पती नवीन कुमार, त्याचा साथीदार संतोष आणि अन्य पाच जणांना पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर अटक केली आहे. नवीनची मुलगीही या प्रकरणात संशयित आहे. अर्चना रेड्डींची 40 कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी बापलेकीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.