360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी 2 खंडावरील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकणार

0
366

नवी दिल्ली, दि.०९ (पीसीबी) : आपल्या आगळ्यावेगळ्या कामगिरीने नेहमी भारतीयांना अभिमानाचे क्षण देणाऱ्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या “360 एक्सप्लोरर” मार्फत 15 ऑगस्ट रोजी जगातील एक अफलातून विक्रम होणार आहे. 360 एक्सप्लोररच्या एकाच टीममधील सदस्य 15 ऑगस्ट रोजी एकाच वेळी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारो व युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करून तिरंगा फडकवणार आहेत.

व्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात लहान वयाचा सोलापूरमधील कुशाग्र वागज, हर्षद वागज, एव्हरेस्टवीर शरद कुलकर्णी, उत्तराखंड पोलीसमधील राजेंद्र नाथ हे करणार एलब्रूस सर पुण्यातील 360 एक्सप्लोरर चे स्मिता घुगे, मध्यप्रदेश येथील ज्योती रात्रे, जालना येथील यश इंगोले हे करणार किलीमांजारो शिखर सर.

ता. 8 रोजी कोव्हिड काळात विशेष एअर बबल विमानाद्वारे दिल्ली येथून या टीम टांझानिया व रशिया देशाकडे निघाल्या असून 15 ऑगस्ट रोजी हे शिखर रशिया व टांझानिया देशाची आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ सारखी असल्याचा फायदा घेऊन एकाच वेळी तिरंगा फडकवणार आहेत.

360 एक्सप्लोरर मार्फत या मोहिमेत सर्व गिर्यारोहकामार्फत विविध विक्रम होणार आहेत.-
– कुशाग्र वागज- 7 वर्ष 3 महिने वयाचा जगातील सर्वात लहान मुलगा युरोपातील सर्वोच्च शिखर 360 एक्सप्लोरर मार्फत सर करणार.
– शरद कुलकर्णी- 59 वयात माऊंट एलब्रूस सर करून सर्वात जास्त वयाचे भारतीय विक्रमवीर होणार. सरांनी आधीच एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.
– राजेंद्र नाथ- उत्तराखंड पोलीस मधील जवान प्रथमच 360 एक्सप्लोरर मार्फत युरोपातील सर्वोच्च शिखरावर जाणार.
– हर्षद वागज- सोलापूरमधील डॉक्टर 360 एक्सप्लोररच्या मोहिमेद्वारे माऊंट एलब्रूस मोहिमेत सहभागी
– स्मिता घुघे- किलीमांजारो सर करून त्यावर सर्वात मोठा तिरंगा फडकवणार.
– यश इंगोले- किलीमांजारो शिखरावर 15 ऑगस्ट रोजी एक आगळावेगळा आर्ट परफॉर्मन्स करणारा प्रथम व्यक्ती.
– ज्योती रात्रे- MP मधील सर्वात जास्त वयाच्या व एकापाठोपाठ 2 मोहिमा करणाऱ्या प्रथम MP मधील महिला climber.
– आनंद बनसोडे- या दोन्ही मोहिमेचे नेतृत्व करणारा आनंद यावेळी पुन्हा एकदा माऊंट एलब्रूस सर करून 2 वेळा एलब्रूस सर करणारा प्रथम महाराष्ट्रीयन बनणार आहे.

360 एक्सप्लोरर मार्फत येणाऱ्या काळात अनेक मोहीमा आखल्या जाणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 360 एक्सप्लोरर ला संपर्क करावा असे आवाहन 360 एक्सप्लोरर च्या अक्षया बनसोडे यांनी केले आहे.

“हा भारतासाठी अतिशय अभिमानाचा क्षण असून 360 एक्सप्लोरर मार्फत अनेकांचे स्वप्ने पूर्ण करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. 2 खंडांवर एकाच वेळी तिरंगा फडकवून जो विक्रम रचला जात आहे याचा खूप जास्त अभिमान वाटतो.”
– आनंद बनसोडे (एव्हरेस्टवीर, 360 एक्सप्लोरर)