विशेष युवा उपक्रम ‘युवान’ पोस्टरचे अनावरण

bpcauthor
1 Min Read

चिंचवड दि. २० चिंचवड भागातील प्रतिभा महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकाऱ्याने ‘ युवान’ या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले. या अनावरण सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेंद्र कांकरिया, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.क्षितिजा गांधी उपस्थित होते. पूर्णम इकोव्हिजनचे संचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधत उपक्रमाची माहिती दिली. या वेळी महाविद्यालयाच्या एनएसएस समन्वयक सुप्रिया गायकवाड, फाऊंडेशनचे शेखर पंडित, श्रेयस ठाकरे, अक्षय पंगूडवाले, अक्षय केळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रवाह सोशल फाऊंडेशनच्या वतीने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली युवान हा विशेष उपक्रम १६-२५ वयोगटांतील तरुण-तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. दि.१ ते १५ ऑगस्ट २०२६ ह्या कालावधीत पुणे विद्यापीठातील ५०००० हून अधिक तरुण विविध सामाजिक कार्यात सहभाग घेणार आहेत.
पर्यावरण, गडकोट संवर्धन, शिक्षण, आरोग्य, शेती, शाश्वत विकास, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयात हे सर्व तरुण-तरुणी आपले योगदान देणार असल्याचे फाउंडेशन तर्फे सांगण्यात आले आहे.

प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थी देखील या अभियानांतर्गत सहभागी होणार असल्याचे सांगून महाविद्यालय या उपक्रमांतर्गत विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे प्राचार्य क्षितिजा गांधी यांनी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

Share This Article