अजितदादांचा अस्थिकलश पिंपरीत दर्शनासाठी दाखल; नागरिकांची भावपूर्ण उपस्थिती

1 Min Read

दि.०३(पीसीबी)- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या दर्शनासाठी आज सकाळी ११ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात आणण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी खराळवाडी येथील पक्षाच्या कार्यालयातून अस्थिकलश स्मारकात आणला.यावेळी “अजितदादा… अमर रहे… अमर रहे…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

योगेश बहल यांच्यासह पक्षाचे नेते, माजी आमदार विलास लांडे,स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमाताई सावळे,माजी महापौर वैशाली घोडेकर वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सारंग जी कामतेकर,नगरसेवक नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे,माजी नगरसेवक अजित गव्हाणे पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

स्मारकाच्या समोरील प्रांगणात फुलांनी सजविलेल्या मंचावर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दुपारी ३ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर पवना नदीत अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे.या प्रसंगी उपस्थितांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Share This Article