महापालिका नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार कोळप यांच्याकडे

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि . १० ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त असलेल्या नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त मुकेश खेमा कोळप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.

उपायुक्त सिताराम देवचंद बहुरे यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाशिवाय भुमी जिंदगी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिसरे उपायुक्त राजेश अंकुश आगळे यांच्याकडे आकाशचिन्ह परवाना विभागाच्याशिवाय अधिकचा कायदा विभाग देण्यात आला. सहायक आयुक्त तानाजी मारुती नरळे यांच्याकडे समाजविकास बरोबरच माध्यमिक शिक्षण विभाग सुपूर्द केला आहे.

Share This Article