दोन दिवसांत टीपी रद्द करण्याचे आश्वासनअखेर आक्रमक चऱ्होलीकरांपुढे महापालिका आयुक्त झुकले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि . २४ ( पीसीबी ) – कुदळवाडीकरांनी रस्त्यावर उतरायचा इशारा देताच त्यांचा ३८० हेक्टरवरचा टीपी रद्द कऱण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना जाहीर करावा लागला. आता चऱ्होली परिसरातील पाच टीपी स्किममध्ये १४२५ हेक्टर जमीन घेण्याचा निर्णयसुध्दा गावकी एक झाल्याने रद्द करण्याचे संकेत मिळाले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासमोर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना फोन लावला असता, दोन दिवसांत म्हणजे सोमवारी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे कृती समिती सदस्यांनी सांगितले. माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या नेतृत्वाखाली चऱ्होली आणि १२ वाड्या एकत्र आल्या आणि पुढच्या आठवड्यात गावबंदी, महापालिका कार्यालयाला टाळे, पालिकेची करबंदी अशा पध्दतीने मोठ्या आंदोलनाची दिशा जाहीर केली. कोणत्याही परिस्थितीत टीपी स्मिक करणारच असा निग्रह करणाऱ्या आयुक्त सिंह यांना ग्रामस्थांनी वज्रमूठ केल्याने झुकायला लागले.

आंदोलनाची कल्पना देण्यासाठी सर्व ग्रामस्थ आज सकाळी मोशी येथे आमदार महेशदादा लांडगे यांना भेटायला गेले होते. तिथेच त्यांनी आयुक्त साहेबांना फोन लावला होता, त्यांनी टीपी विषयी विचारले असता आयुक्त साहेबांनी सांगितले की, सोमवारी टीपी विषयी सकारात्मक विचार करून निर्णय दिला जाईल.

चऱ्होली ग्रामस्थांना विचारणा केली असता जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमची भूमिका कायम असेल. सोमवारी या विषयावर सकारात्मक निर्णय होईल, असे दिसते.

Share This Article