टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

1 Min Read

दिघी, दि.02 (पीसीबी)
टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडेसहा वाजता वडमुखवाडी येथे घडली.

सिंधू चंद्रकांत पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमन धनाजी मोहिते (वय ५२, रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक उमेश लक्ष्मण गायकवाड (वय १९, रा. वडमुखवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन मोहिते आणि त्यांची मैत्रीण सिंधू पाटील या दोघी वडमुखवाडी मधील लक्ष्मीनारायण नगर कॉलनी मधून पायी चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने सिंधू यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने सिंधू यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक उमेश हा पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article