भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; महिला गंभीर जखमी

bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. 17 (पीसीबी) : भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महावीर चौक चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलीला ट्युशन वरून घरी नेण्यासाठी आल्या होत्या. मुलीला दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना महावीर चौक चिंचवड येथे भरधाव रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी महिला यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आरोपी रिक्षा चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article