भांडणे सोडवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

PCB Admin
1 Min Read

पिंपरी,दि. १९ (पीसीबी)

भांडणे सोडवल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 16) पिंपरीतील लालबहादूर शास्त्री उद्यानाजवळ घडली.

यासीर आलम अन्सारी (वय 26 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाफर सिद्दीकी व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांनी त्यांचा भाऊ व आरोपी यांच्यातील भांडणे सोडविली. याचा राग मनात धरून आरोपीने अन्सारी यांना शिवीगाळ केली. तसेच अन्सारी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Share This Article