शहरात बुधवारी सहा ठिकाणी झाडे पडली

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि. 24) सहा ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात कोणी जखमी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सुदर्शनचौक, पिंपळे गुरव येथे सकाळी सव्वा सात वाजता झाड पडले. त्यानंतर साडेसात वाजता औंध जिल्हा रुग्णालय परिसरात एक झाड पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास टाटा मोटर्स चिंचवड येथे कंपनीच्या गेट समोरील झाड पडले.

त्यानंतर सव्वा अकरा वाजता मोरे पाटील चौक कुदळवाडी चिखली आणि 12 वाजता बिर्ला हॉस्पिटल जवळ चिंचवड गाव येथे झाड पडले. एक वाजताच्या सुमारास थेरगाव येथे एका सोसायटीमध्ये झाड पडल्याची घटना घडली. बी जी कॅर्नर निगडी येथे दुपारी झाड पडले. या झाडाखाली चार वाहने अडकली.

झिरो बॉईज चौक अजमेरा पिंपरी येथे एका सोसायटीची भिंत कोसळली. या भिंतीखाली तसेच झाड पडीच्या घटनांमध्ये अनेक वाहने अडकली. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This Article