वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. 11 (पीसीबी)
वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड झाली आहे. वाहनांची तोडफोड करीत तिघांनी मिळून एकास लुटले. ही घटना बुधवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.

अंशु जॉर्ज किलिंगकर (वय 23), आर्यन रमन पवार (वय 19, दोघेही रा. काळेवाडी) आणि करण रवी पटेकर (वय 25, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतिश रामकेवल यादव (वय 30, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास आरोपी वाहनांच्या काचा फोडत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी तुम्ही गाडीच्या काचा का फोडत आहात, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी करण पटेकर याने फिर्यादी यांची कॉलर पकडून म्हणाला की, ‘तू मला ओळखत नाही का, मला करण पटेकर म्हणतात. याला पकडा रे’, असे त्याच्या साथीदारांना सांगितले. आरोपी अंशु व आर्यन यांनी पकडल्यावर आरोपी करण याने फिर्यादी यांच्या खिशात हात घालून 650 रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी आणि इतर लोकांच्या वाहनांची तोडफोड केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article