तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 4) सायंकाळी पिंपरी भाजी मंडई येथे करण्यात आली.

शक्ती रामरतन बहोत (वय 37, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शैलेश मगर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शक्ती बहोत याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article