नोकरीच्या आमिषाने तरुणीची दोन लाखांची फसवणूक

bpcauthor
1 Min Read

कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी ते मे 2024 या कालावधीत वाकड आणि हिंजवडी येथे घडली.

प्रदीप उर्फ विक्रांत राजू भोसले (रा. आळंदी), परेश देविदास पाटील (रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो असे आमिष दाखवले. आरोपींनी कंपनीचे बनावट ऑफर लेटर तरुणीच्या ईमेलवर पाठवले. तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर ते ऑफर लेटर बनावट असल्याचे उघडकीस आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article