पुण्यात राहुल गांधींची होणार सभा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पुण्यात राहुल गांधींची देखील सभा. 3 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा. पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात घेणार सभा. सभेमार्फत काँग्रेस पुणे शहरासह जिल्ह्यात करणार मोठं शक्ती प्रदर्शन. पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार राहुल गांधींची सभा.

महायुतीच्या चार उमेदवारांसाठी मोदी यांची २९ एप्रिल रोजी रेसकोर्स मैदानावर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला तोडिस तोड उत्तर म्हणून राहुल गांधी यांच्या सभेकडे पाहिले जाते. महाआघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (पुणे) , सुप्रिया सुळे (बारामती) , डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) आणि संजोग वाघेरे (मावळ) या चार उमेदवारांसाठी ही संयुक्त सभा होणार आहे.

Share This Article