देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, चोर महिलेला अटक

PCB Admin
1 Min Read

देहुगाव येथील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी घडली.याप्रकऱणी पोलिसांनी चोर महिलेला अटक केली आहे.

पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी 35 वर्षीय जालन्याती एका महिलेला अटक केली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या तुकोबारायांच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. मंदिराच्या मुख्य मंडपातील गर्दीचा फाय़दा घेलून आरोपी महिलेने फिर्यादी महिलेचे 7 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. आरोपी महिलेला तात्काळ पकडण्यात आले. देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article