डॉ.नंदकिशोर कपोते यांना दूरदर्शन भारतसरकार ची “टाॅप ग्रेड “

PCB Admin
1 Min Read

प्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते यांना नुकतेच दिल्ली दूरदर्शन प्रसार भारती, भारत सरकार च्या” टाॅप ग्रेड ” ने सन्मानित करण्यात आले. या आधी डॉ.नंदकिशोर कपोते यांना दिल्ली दूरदर्शन प्रसार भारती भारत सरकार ची “ए” ग्रेड होती.
दूरदर्शनतर्फे शास्त्रीय कलाकारांना दिला जाणारा ” टाॅप ग्रेड “हा देशातील सर्वोच्च बहुमान आहे. डॉ.नंदकिशोर कपोते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक असुन महाराष्ट्रातील पहिले पी.एच.डी.प्राप्त कलाकार आहेत व कथक नृत्यातील सर्वांगीण योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते केन्द्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने दिल्ली येथे गौरविण्यात आले आहे.

Share This Article