हॉर्न वाजवल्याचा जाब विचारल्याने दोघांना मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. ४ मार्च – हॉर्न वाजवल्याचा जाब विचारल्याने तिघांनी मिळून 17 वर्षीय मुलाला आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रस्ता मोशी येथे घडली.

शरमन नॉरमन आरलेन (वय 17, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/जीएच 9090 आणि दुसऱ्या चारचाकी वाहनातील एकूण तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरमन हे त्यांचा मित्र प्रणव पाटील आणि मैत्रीण रिया पाटील यांना भारतमाता चौक मोशी येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून आले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या दुचाकीच्या पाठीमागे थांबलेल्या कार चालकाने मोठमोठ्याने हॉर्न वाजवला. त्याबाबत फिर्यादी यांनी कार चालकाला जाब विचारला. त्यावरून दोन कारमधील तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी त्यांची मैत्रीण रिया आली असता तिला देखील मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article