कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, कार चालक मात्र पसार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. ४ मार्च (पीसीबी) – वेगाने कार चालवून दोघांना धडक देत कार चालक हा पसार झाला मात्र या अपघातात दोघांटा मृत्यू झाला आहे, हा अपघात रविवारी (दि.3) चांदे फाटा, हिंजवडी येथे घडला आहे,

तर अपघातात कृष्णदास संजय चौधरी (वय 35) व विनोद सरोज (वय 25) याचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी मोहन दगुलाल पाटील (वय 46 रा.माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून टाटा नेक्सॉन (एम.एच14 के.डब्ल्यू.5892) याच्या वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या ताब्यातील कार वेगाने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत गाडी चालवत होता. यावेळी त्याने चौधरी व सरोज यांना जेरदार धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले, मात्र कारचालकाने थांबून त्यांना मदत न करता तो पसार झाला. वेळीच उपचार न मिळालेला जखमी दोघांचाही मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस कार चालकाचा तपास करत आहेत.

Share This Article