हातभट्टीची दारू निर्मी्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन केले नष्ट

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – हातभट्टीची दारु निर्मिती प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) शिरगाव पवना नदीच्या काठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 यांनी केली आहे.

याप्रकरणी महिलेवर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस शिपाई भरत श्रीमंत माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही कोणत्याही परवानगी शिवाय पवना नदीकाठी हातभट्टीवर दारु निर्मिती करत होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून 4 लाख 500 रुपयांचे 400 ली. गुळाचे मिश्रण रसायन घालून भिजत घातलेले मिश्रण नष्ट केले. यावेळी कारवाई सुरु असताना आरोपी महिला ही झाडा-झुडपा मधून पळून गेली. शिरागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article