खिडकीचे गज कापून प्रवेश करत कंपनीत चोरी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

खेड, दि. २३ (पीसीबी) – कंपनीच्या खिडकीचे गज कापून आत मध्ये प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाख 68 हजार रुपये किमतीचे कॉपरचे साहित्य आणि पितळाचे नट बोल्ट चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) पहाटे सव्वा एक वाजताच्या सुमारास वासुली ता. खेड येथील क्राफ्ट पावरकॉन पॉवर प्रोडेक्स या कंपनीत घडली.

जगन्नाथ विश्वनाथ कुंभार (वय 54, रा. मोशी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंभार काम करत असलेल्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने कॉपरचे साहित्य आणि पितळाचे नट बोल्ट असे एकूण दोन लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कंपनीच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने कंपनीत प्रवेश केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article