देहूगाव येथील कंपनीत सव्वा दोन लाखांची चोरी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

देहूगाव, दि. २३ (पीसीबी) – देहूगाव येथील इको वेल्ड ग्लोबल इक्विपमेंट्स कंपनीमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी दोन लाख 30 हजार रुपये किमतीचे जॉब चोरून नेले. ही घटना 16 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली.

वैभव विजय कुमार सुतार (वय 28, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत काम करत असलेल्या एका कामगाराने 16 जानेवारी रोजी फिर्यादी यांना फोन करून माहिती दिली की, कंपनीच्या पाठीमागील बाजूला असलेले पत्र्याचे नट बोल्ट खोलून कंपनीत प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाख 30 हजार रुपये किमतीचे लोखंडी जॉब चोरून नेले आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article