पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

शिरगाव, दि. १८ (पीसीबी) – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये नऊ लाख 62 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) करण्यात आली.

पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने शिरगाव गावच्या हद्दीमध्ये पवना नदीच्या कडेला मोकळ्या जमिनीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. नऊ लाख 62 हजार रुपये किमतीची बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता गुळ मिश्रित कच्चे रसायन एकत्रित करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरगाव पोलिसांनी कारवाई करत ही दारूभट्टी उध्वस्त केली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article