कंटेनरची दुचाकीला धडक; भोसरीत वृद्धाचा मृत्यू

1 Min Read

भोसरी, दि. १७ (पीसीबी) भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोशल गार्डन समोर भोसरी येथे घडली.

मुरलीधर पांडुरंग लांडे (वय 70, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल मुरलीधर लांडे (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 14/एचयु 3751) चालक जगदीश कुमार चेतराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या डुडुळगाव येथे भाड्याने खोल्या दिल्या आहेत. त्याचे भाडे घेण्यासाठी फिर्यादी यांचे वडील मुरलीधर लांडे हे सोमवारी सकाळी दुचाकीवरून गेले. भाडे घेऊन परत घरी येत असताना रोशल गार्डन जवळ त्यांच्या दुचाकीला एका कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये मुरलीधर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article