अल्पवयीन मुलाकडे सापडले पिस्टल

PCB Admin
1 Min Read

चिखली, दि. १३ (पीसीबी) – चिखली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) सायंकाळी रामायण मैदान, जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदा सुनील शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायण मैदान येथे एक मुलगा आला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रामायण मैदान येथे सापळा लाऊन मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्टल आणी त्यात एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल जप्त करत मुलाला ताब्यात घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article