शितळानगर मधून ओम्नी कार पळवली, आरोपी अटकेत

bpcauthor
1 Min Read

देहूरोड, दि. ०४ (पीसीबी) – घराजवळ पार्क केलेली ओम्नी कार (एमएच 14/एई 4112) चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी शितळानगर, देहूरोड येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नितीन अर्जुन शिखरे (वय 30, रा. श्रीनाथनगर जांब बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गोविंदा अंजली म्हेत्रे (वय 32, रा. मामुर्डी, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हेत्रे यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची ओम्नी कार त्यांचे मित्र साजिद खान यांच्या घराजवळ शितळानगर येथे 1 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पार्क केली. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांची कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article