महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखलीत एकास अटक

PCB Admin
1 Min Read

चिखली, दि. २१ (पीसीबी) – महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखली पोलिसांनी एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली.

मयूर संजय शिंदे (वय 30, रा. देहू-आळंदी रोड, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने फिर्यादी महिलेचा सतत पाठलाग केला. महिलेला व्हाटसअपवरून अश्लील व्हिडीओ व मेसेज पाठवले. अश्लील व्हिडीओ कॉल करून महिलेचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article