कंपनीतील कामगारानेच चोरले तब्बल 23 लाखांचे साहित्य…

PCB Admin
1 Min Read

तळवडे,दि.११(पीसीबी) – कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने तब्बल 23 लाख रुपयांचे साहित्य चोरले. ही घटना फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत जोतीबनगर, तळवडे येथील ड डेकॉर स्टुडीओ या कंपनीत घडली.

शाहरुख गफर शेख (वय 30, रा. कोंढवा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद आरिफ आयुब शेख (वय 31, रा. धानोरी रोड, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या कंपनीत काम करण्यासाठी येत असे. त्याने एक महिन्याच्या कालावधीत कंपनीतून पॅनेल सॉ आणि डस्ट कलेक्टर, एज बायडिंग अॅड कॉम्प्रेसर या मशिन आणि कंपनीतील कॉट, कपाट, प्लाउड असे एकूण 23 लाखांचे साहित्य चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article