पिंपरी भाजी मंडई मधून दुचाकी चोरीला

1 Min Read

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी भाजी मंडई मध्ये भाजी आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोरून नेली. ही घटना 15 एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत घडली.

विनोद पोपट कांबळे (वय 40, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 15 एप्रिल रोजी दुपारी पिंपरी भाजी मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकी (एमएच 14/एचवाय 4296) पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूला चावी बनविण्याच्या दुकानाजवळ पार्क केली. अर्ध्या तासात फिर्यादी भाजी घेऊन आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article