लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – लग्नाचे आमिध दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार जुलै 2019 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला.

राकेश रवींद्रनाथ नायर (वय 22, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीकडून राकेश याने तीन लाख रुपये घेऊन त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article