उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल पळवले

PCB Admin
1 Min Read

चिखली, दि. २ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून तीन मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना मोरेवस्ती, चिखली येथे स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये घडली. ही घटना 16 नोव्हेंबर 2022 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी 1 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय बंडू पवार (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. खोलीतून 15 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article