खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अत्यावस्थ

1 Min Read

पुणे,दि. २९ (पीसीबी) : पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान बापटांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.

अद्याप अधिकृत माहिती हाती आली नाही. पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.

Share This Article