चिंचवडेनगर मध्ये भर दिवसा घरफोडी, ७० हजारांचा ऐवज लंपास

1 Min Read

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – वाल्हेकर वाडी चिंचवड येथे अज्ञातांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी एक ते सायंकाळी सव्वापाच वाजताच्या कालावधीत घडली.

मल्लिकार्जुन शिवदास भंगे (वय ३२, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भंगे यांचे घर कुलूप लाऊन बंद असताना भर दिवसा अज्ञातांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून ५० हजारांचे सोन्या चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article