प्रेयसीबद्दल अपशब्द वापरल्याने मुलाने केला बापाचा खून

1 Min Read

दिघी, दि. ८ (पीसीबी) – प्रेयसीविषयी बापाने अपशब्द वापरले म्हणून मुलाने बापाचा गळा आवळून खून केला. आईने आणि दुसऱ्या मुलाने खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री नऊ वाजता दिघी येथे घडली.

अशोक रामदास जाधव (वय ४५, रा. समर्थ सदन बिल्डिंग, दिघी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा राहुल अशोक जाधव (वय २५), अनिल अशोक जाधव (वय २३) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही मुलांसह अशोक यांच्या पत्नी विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याबाबत अशोक यांना माहिती झाली. त्यामुळे अशोक यांनी अनिल याच्या प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारले. त्याचा अनिलला राग आला. त्याने अशोक यांचा दोरीने गळा आवळून खून केला. यावेळी अशोक यांच्या नाकातोंडातून फरशीवर रक्त सांडले होते. आईने फरशीवरील सर्व रक्त अशोक यांच्या शर्टाने पुसून काढले. तर राहुल याने कपडे वाळत घातलेली दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेतल्याचा बनाव रचला. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article