वाकड मधून कार चोरीला

1 Min Read

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – वाकड मधील ताकभाते कॉर्नरवर पार्क केलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.

तानाजी नवनाथ ताकभाते (वय 49, रा. ताकभाते कॉर्नर, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ताकभाते यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची कार (एमएच 14/एएम 4147) ताकभाते कॉर्नरवर शिनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार्क केली. रात्रीच्या वेळी त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article