कसब्यात मतदानाला, विदेशात गेलेल्या नागरिकांनीही लावली हजेरी !

PCB Admin
1 Min Read

चिंचवड ,दि २६ (पीसीबी) – कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. नवमतदार ते ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत. अशातच मतदानाच्या सकाळच्या सत्रात अनोखी बाब निदर्शनास आली. लंडन येथे वास्तव्याला असलेल्या अमृता देवकर- महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यात येऊन मतदानही केले.

अमृता देवकर-महाजन सध्या लंडन येथे वास्तव्याला आहेत. मात्र त्या मुळच्या पुण्याच्या आहेत आणि कसबा पेठेत त्यांचे घर आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने त्यांनी मतदानासाठी पुण्याला यायचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या रविवारी पहाटे मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास करून त्यांनी घरी जाण्यापूर्वी कसब्यातील मतदान केंद्र गाठले. त्यांचे बंधू विक्रांत देवकर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.

Share This Article