मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी चोरीला

PCB Admin
1 Min Read

चाकण, दि. २० (पीसीबी) – मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १८) रात्री पावणे नऊ ते साडेदहा वाजताच्या कालावधीत भुजबळ आळी चाकण येथे घडली.

शैलेश हरिभाऊ बिरदवडे (वय ३९, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी भुजबळ आळी येथील काकडे यांच्या मोकळ्या जागेत पार्क केली. तिथून अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article