हिंदू तरुणाचे जबरदस्तीने धर्मांतर आणि सुंता केल्याचा प्रकार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दौंड, दि. १७ (पीसीबी) : दौंड शहरात एका हिंदू वाल्मिकी समाजातील तरुणाने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याचा जबरदस्तीने सुंता केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड शहरात दहा दिवसांपूर्वी एका हिंदू विवाहितेबरोबर बळजबरीने लग्न लावल्यानंतर पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा मुलगा वसीम बादशहा शेख याला अटक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

दौंड शहरातील ३४ वर्षीय तरुणाने एका मुस्लिम समाजातील विधवा महिलेबरोबर २०१८ मध्ये कुर्डूवाडी (जि. सोलापूर) येथे लग्न केले होते. दौंडमध्ये भीमा नदीकाठी एका वीट भट्टीवर तो मजूरी करीत होता. हिंदु तरूणाशी लग्न केल्याने कुमेल कुरेशी व त्याच्या सहकाऱ्यांनी त्या तरुणाच्या पत्नीला संबंधित तरुणास सोडचिठ्ठी देण्याचा प्रस्ताव देत मुस्लिम समाजातील तरुणाबरोबर लग्न लावण्याचे आश्वासन मुस्लिम दफनभूमीतील कार्यालयात दिले होते. परंतु तिने या प्रस्तावास नकार दिला होता.

दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी कुमेल कुरेशी उर्फ हाजीसाहब (रा. कुंभार गल्ली, दौंड), आसिफ शेख (पूर्ण नाव उपलब्ध नाही) व एक डॅाक्टर यांनी जबरदस्तीने त्या हिंदू तरुणाची सुंता केली. या प्रकरानंतर त्या तरुणाचे कुटुंब भीतीपोटी दौंड शहर सोडून गेले होते.

Share This Article