लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

PCB Admin
1 Min Read

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पीजीवर जाऊन तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीसोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला जातीवाचक बोलून अपमानित केले. ही घटना 22 मे रोजी दुपारी हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने सोमवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश चंद्रकांत इगवे (वय 24, रा. अंबाजोगाई, जि. बीड) चंद्रकांत इगवे (वय 50) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. तिचा पाठलाग करून तिचे अश्लील फोटो काढून ती राहत असलेल्या पी जी वर जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी ऋषिकेश याच्या आई वडिलांनी पीडित तरुणीला मारहाण करून तिच्याशी ऋषिकेश याचा विवाह करू देता येणार नाही असे म्हणत जातीवाचक बोलून अपमानित केले. सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले तपास करीत आहेत.

Share This Article