उघड्या दरवाजावाटे दागिन्यांची चोरी

1 Min Read

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातून ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी बोडकेवाडी, माण येथे घडली.

सतीश संतोष साबळे (वय 27, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडा होता. फिर्यादी घरात काम करत असताना अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. उघड्या कपाटाच्या लॉकर मधून 55 हजारांचे सोन्याचे गंठण, पाच हजारांचे मिनी मंगळसूत्र, पाच हजारांची अंगठी आणि 10 हजारांची एक अंगठी असे एकूण 75 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article