घरफोडी करून चार लाखांचे दागिने रोकड लंपास

PCB Admin
1 Min Read

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी दीड ते रविवारी (दि. 18) पहाटे सव्वापाच वाजताच्या कालावधीत दिघी रोड, भोसरी येथे घडली.

कुंडलिक बबनराव पिंपरकर (वय 54, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी दुपारी त्यांच्या गावी गेले होते. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. एक लाख 34 हजारांचे सोन्याचे दागिने, 16 हजारांचे चांदीचे दागिने, दोन लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी पहाटे फिर्यादी गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article