नात्यातील तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

1 Min Read

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – मामेभावाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यात मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना 2 मार्च ते 11 जून या कालावधीत मालवण तालुक्यातील दांडी मालवण येथे घडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दांडी मालवण येथील एका तरुणावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 40 वर्षीय आईने रविवारी (दि. 12) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नात्यातील तरुणाने फिर्यादी यांच्या 13 वर्षीय मुलीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दांडी मालवण येथे लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पिडीत मुलगी 18 आठवड्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलिसांनी हा गुन्हा सिंधुदुर्ग येथे वर्ग केला आहे.

Share This Article