पंढरपूरला देवदर्शनाला गेलेली पिंपरीतील वृद्ध महिला बेपत्ता

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी येथील 72 वर्षीय वृद्ध महिला पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेली. त्यानंतर महिलेशी काहीही संपर्क होत नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली आहे.

निशा नारायण सरमळकर (वय 72, रा. अजमेरा आर सेक्टर, बिल्डिंग नंबर आर सी 6, फ्लॅट नंबर 202, पिंपरी, पुणे) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.

निशा सरमळकर 21 एप्रिल 2022 रोजी देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेल्या. त्यानंतर 22 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून त्यांचा फोन बंद येऊ लागला. त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या घरच्यांचा काहीही संपर्क झाला नाही. काही दिवसांचा कालावधी उलटला असून निशा यांचा काहीही संपर्क होत नाही तसेच त्यांच्याबाबत माहिती मिळत नाही.

अंगाने सडपातळ, रंग गोरा, चेहरा उभा, नाक सरळ, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा चष्मा, उंची 160 सेंटीमीटर, डोक्याचे केस काळे पांढरे विरळ, साडी नेसलेली, पायात साधी चप्पल, जवळ पैसा अडका काहीही नाही, शिक्षण बारावी झाले असून त्या मराठी, हिंदी भाषा बोलतात. वरील वर्णनाच्या महिलेबाबत माहिती मिळाल्यास निलेश सरमळकर (9923277720), राहुल सरमळकर (9373317414) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article