काम न केल्यास एकेकाच्या कानाखाली देईन – अजित पवार

0
171

पुणे, दि.५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरतात. दरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भर बैठकीत सुनावलं आहे. एवढंच नव्हे तर काम न केल्या एकेकाच्या कानाखाली देईन अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, लोकांना पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचं नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखाली काढेन. बाकी काही नाही करायचं. यातून तुमची बदनाही होत नाही. पवार साहेबांची, पक्षाची बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा सुरू आहे? पदाचा राजीनामा घेणार आणि टोकाचा वागेन फार. एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यावर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून लोक तुमच्याकडे बघतात.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी पुण्यात औंध परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने कारची तोडफोड करत महिलेला शिवीगाळ केली होती.